Pune News : खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील सात वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील गेल्या सात वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पुणे ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी (दि.15) ही कामगिरी केली.

सतीश दिलीप सूर्यवंशी (वय 30, रा. बालाजीनगर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी  त्याला राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात गेल्या सात वर्षापासून फरार होता. दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी दहशतवाद विरोधी कक्षाचे मोसिन शेख यांना फरार आरोपी सतीश सूर्यवंशी ससेवाडी परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

अटक आरोपी सराईत असून त्याच्यावर यापूर्वी पुणे शहर व पुणे ग्रामीण या ठिकाणी खून, दरोड्याची तयारी, दंगा करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.