Hinjawadi : दोन तरुणींचा विनयभंग, पिडीत तरुणीच्या भावाला मारहाण; आरोपी अटकेत

Accused arrested for molestation of two young women and beating the victim's brother.

0

एमपीसी न्यूज – तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीच्या मामे बहिणीला रस्त्यात अडवून तिच्याशीही गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच पिडीत तरुणीच्या भावाला मारहाण केली. ही घटना 28 जून रोजी रात्री सरकार चौक, मारुंजी हिंजवडी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अक्षय बुचडे (रा. मारुंजी, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य दोन मित्रांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने त्याच्या एम एच 14 / एच के 2323 या कारने फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

तसेच 28 जून रोजी रात्री फिर्यादी यांच्या मामे बहिणीला रस्त्यात अडवले.

फिर्यादी यांच्या भावाच्या कारला अडवून कारवर लाथा मारल्या. तसेच भावाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अक्षय याला अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like