Mhalunge News : अल्पवयीन आदीवासी मुलीवर लैंगिक आत्याचार, आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज – अल्पवयीन आदीवासी मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि.19) दुपारच्या सुमारास म्हाळुंगे परिसरात हा प्रकार घडला. 

योगेश साहेबराव चाटी (वय 31, रा. म्हाळुंगे, खेड, मुळगाव मालेगाव, वाशिम) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी (दि.21) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने अल्पवयीन मुलीला आमच्या घरात कुणी नाही मला भाजी बनवून दे असे म्हणत स्वतःच्या घरी नेले व लैंगिक आत्याचार केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.