Chinchwad Crime News : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार, आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज – इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत जवळीक निर्माण करून लैंगिक आत्याचार करणा-या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता रावेत येथे हा प्रकार उघडकीस आला. 

चाँद अकबर शेख (वय 22, रा. दगडोबा चौक, चिंचवडेनगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 17) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अटक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी आणि पीडित अल्पवयीन मुलीची एक महिन्यापूर्वी इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर ओळख झाली. यातून ओळख वाढवून आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरी जात होता. यादरम्यान आरोपीने मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.