Attack on Police : तडीपार आरोपीकडून पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज : अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच तडीपार गुंडाने धक्काबुक्की केली आहे. (Attack on Police) ही घटना शनिवारी (दि.3) सांयकाळी साडे सहा वाजता दळवीनगर झोपडपट्टी येथे घडली आहे.

आकाश ऊर्फ भावड्या भारत कुदळे (वय 27 रा. दळवीनगर) असे अटक आरोपीचे नाव असून अमोल गुलाब माने यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi blood donation : आळंदीत गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजे ग्रुपतर्फ भव्य रक्तदान शिबिर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा तडीपार असून तो परिसरात आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी हे त्यांना अटक करण्यास गेले असता (Attack on Police) आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. फिर्यादी यांना अटक केली असून चिंचवड पोलीस ठाण्यात आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.