Pune News : शिर्डीतील एका खून प्रकरणातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

आज पहाटेची घटना

एमपीसी न्यूज : कोपरगाव येथील एका कारागृहात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  याच आरोपीने आज सकाळच्या सुमारास बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढलाय.

_MPC_DIR_MPU_II

समीर अक्रम शेख (रा. शिर्डी) असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शिर्डी येथील एका खून प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.  बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डीत झालेल्या एका खून प्रकरणात पोलिसांनी समीर शेख याला अटक केली होती. समीर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. खून प्रकरणात तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. काही दिवसांपूर्वी त्याने कोठडीत असतानाच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन कर्मचारीही उपस्थित होते.

दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्याने देखरेखीसाठी ठेवलेल्या पोलिसांची नजर चुकवून पळ काढला. संपूर्ण रुग्णालय परिसरात शोधाशोध केल्यानंतरही तो सापडला नसल्यामुळे पोलिसांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पुणे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.