Mumbai Blast 1993 : मुंबई 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अखेर अटकेत

एमपीसी न्यूज : गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Mumbai Blast 1993) दाऊद इब्राहिमच्या चार जवळच्या साथीदारांना अटक केली आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार हे चौघे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आहेत. ज्यांना अहमदाबाद येथून पकडण्यात आले आहे. हे चौघेही बनावट पासपोर्टवर अहमदाबादला आले होते.

खरे तर मुंबई बॉम्बस्फोटानंतर हे सर्व आरोपी परदेशात पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अबू बकर, युसूफ भटाका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी या चौघांची नावे असल्याचे गुजरात एटीएसने सांगितले. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे गुजरात एटीएसने सांगितले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून 1993 चे मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Blast 1993) पूर्ण नियोजनाने घडवून आणले गेले. या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 613 जण गंभीर जखमी झाले होते. या भीषण विध्वंसाच्या दृश्यात 27 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. दाऊदच्या सांगण्यावरून हे भयंकर कृत्य करणाऱ्यांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास दाऊदने आपल्या नेटवर्कचा वापर करून स्फोटके अरबी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचवली होती.

Bhosari News : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

शहरातील विविध भागात सुमारे अडीच तास हे स्फोट सुरू होते. संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्या या स्फोटाचा पहिला स्फोट ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’जवळ पहाटे दीड वाजता झाला आणि शेवटचा स्फोट दुपारी 3.40 वाजता ‘सी रॉक हॉटेल’मध्ये झाला.

दुसरीकडे, 2007 मध्ये पूर्ण झालेल्या खटल्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या टप्प्यात, टाडा न्यायालयाने याकुब मेमनसह 100 आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवले होते, तर 23 जणांची खटल्यानंतर निर्दोष मुक्तता (Mumbai Blast 1993) करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.