Osmanabad news: बीड जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी उस्मानाबाद येथे अटकेत.

Accused of murder in Beed district arrested at Osmanabad.

एमपीसी न्यूज (उस्मानाबाद) – खून प्रकरणात बीड पोलिसांना हवा असलेला फरार 27 वर्षीय आरोपीच्या भूम पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्या आरोपीस पुढील तपासासाठी बीड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याप्रकरणी माहिती अशी, भूम तालुक्यातील हंगेवाडी येथील 27 वर्षीय शहाजी शाहत्तर काळे याच्यावर बीड जिल्ह्यातील पो.ठा. नेकनूर येथे गु.र.क्र. 226 / 2020 भा.दं.सं. कलम- 302, 504, 506 अन्वये दाखल आहे.

तो बीड पोलीसांना तपासकामी हवा होता. बीड पोलीसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आंबी पो.ठा. चे प्रभारी सपोनि आशिष खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील पोउपनि वाघुले, पोहेकॉ मुळे, होडशीळ, पोकॉ रामकिसन कुंभार यांच्या पथकाने नमूद आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलसह दि.10 रोजी भुम शहर परिसरातून ताब्यात घेउन त्यास बीड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.