Bhosari : ज्यूस व्यावसायिकाच्या खून प्रकरणी आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – डोक्यात धारदार शस्त्राने वार करत ज्यूस व्यावसायाकीचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री भोसरी येथे घडली. रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आलेल्या या खून प्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_II

रुबल शेख (वय 20, रा. भोसरी, मुळ पश्‍चिम बंगाल) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तुजल शेख (वय 19) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनाऊल हक सय्यद शेख (वय 32, सागर लांडगे चाळ, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तुजल याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सनाऊल भोसरी येथे गेल्या पाच वर्षापासून भागीदारीत ज्यूस सेंटरचा व्यवसाय करत होता. त्याचे भोसरी परिसरातच दोन ज्यूस सेंटर आहेत. त्यातील एका ज्यूस सेंटरवर आरोपी तीन वर्षांपूर्वी काम करत होता. पुढे त्याने स्वतःचे ज्यूस सेंटर सुरु केले. आपल्याकडे काम करणारा कामगार आपल्या पुढे जात असल्याचे जणवल्याने सनाऊल याने आरोपी भाड्याने चालवत असलेले ज्यूस सेंटर दुकान मालकाला जास्त भाडे देऊन स्वतः चालवायला घेतले. यामुळे रुबल याला मूळ गावी परत जावे लागले. परंतु आपले दुकान बंद करण्यास कारणीभूत असलेल्या सनाऊल याला रुबल फोनवरून धमकी देऊ लागला. शनिवारी रात्री रुबल याने आपल्या तीन अल्पवयीन साथीदारांसोबत मिळून सनाऊलचा खून केला. घटनेनंतर रुबल मूळ गावी परत जात होता. परत जात असताना पोलिसांनी त्याला भुसावळ मधून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना देखील पकडले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1