Bhosari Crime News : तडीपारच्या आदेशाचा भंग करणारा आरोपी ताब्यात

पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याच्या होता तयारीत 

एमपीसी न्यूज – तडीपारीचे आदेशाचा भंग करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (दि.19) बालाजीनगर, भोसरी येथे दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. 

पवन बंडू शिरसाट (वय 22, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आनंद साळवी यांनी भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन शिरसाट हा तडीपार असून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले. मात्र, कारवाईसाठी ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.