Pune : ससुन रुग्णालयातून आरोपी पसार

पोलीस शिपाई के. व्ही. साबळे यांनी दिली फिर्यादी

एमपीसी न्यूज : ससुन रुग्णालयातून अपहरणाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी 2 च्या सुमारास पळून गेला आहे. संजय वसंत नलावडे (वय 23, रा.दत्तवाडी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई के. व्ही. साबळे यांनी फिर्यादी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससुन रुग्णालयात काल आरोपी संजय नलवडे हा फिर्यादी साबळे यांच्या कायदेशीर रखवालीमध्ये होता. परंतु फिर्यादी यांना गुंगारा देऊन तो दुपारी तेथून पळून गेला.

आरोपी संजय नलावडे याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात अपहरणासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला पोलिसांनी अटक केली होती. पळून गेलेल्या आरोपीचा शोध बंडगार्डन पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.