Act on NCDS: असंसर्गजन्य आजार सप्ताहानिमित्त मंथन फाउंडेशनच्या ‘ॲक्ट ऑन एनसीडीएस’चा शुभारंभ 

एमपीसी न्यूज – असंसर्गजन्य आजार सप्ताहाच्या निमित्ताने प्रतिभा महाविद्यालय व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या सहकार्याने मंथन फाउंडेशनने ॲक्ट ऑन एनसीडीएस (Act on NCDS) प्रकल्प – इन्व्हेस्ट टू प्रोटेक्टचा शुभारंभ केला.

माजी लायन गव्हर्नर डॉ. दीपक शहा, अध्यक्ष मंथन फाउंडेशन आशा भट्ट, लायन्स क्लब ऑफ तळेगाव अध्यक्ष लायन मयूर राजगुरव, प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, लायन प्रशांत शहा, लायन अक्षता राजगुरव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

एनसीडीएसवरील 2022 मधील जागतिक कृती सप्ताहाचे उद्दिष्ट सरकार, देणगीदार, आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि खाजगी क्षेत्रापर्यंत संदेश पोहोचवण्याचे आहे. आजच एनसीडीएसमध्ये गुंतवणूक करा व उद्या जीव आणि पैसा वाचवा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान चा एक भाग म्हणून कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम 2010 मध्ये सुरू करण्यात आले, त्यावर आधारित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Fake Video : मुले पळवून नेणाऱ्या टोळीच्या व्हिडीओ ‘फेक’ – पुणे पोलीस

मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी सांगितले की,  ॲक्ट ऑन एनसीडीएस (Act on NCDS) अंतर्गत 2024 पर्यंत 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक लाख व्यक्तींची स्क्रीनिंग करण्याचे नियोजन आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि  तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) समुदायापासून तपासणी, स्क्रीनिंगची सुरुवात करण्यात आली.

असंसर्गजन्य रोगांच्या (एनसीडीएस) उपचारांसाठी आरोग्य सेवा सुविधेच्या योग्य स्तरावर प्रतिबंध, लवकर निदान, व्यवस्थापन आणि संदर्भ देण्यासाठी आरोग्य प्रोत्साहन आणि जागरूकता निर्माण करण्यावर हा कार्यक्रम केंद्रित आहे.

या प्रसंगी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव व लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांनी प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि एनसीडीएसच्या (Act on NCDS) तपासणीसाठी संस्थेस वैद्यकीय उपकरणे सुपूर्त केले आणि मंथन फाऊंडेशनच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. चेतन चव्हाण यांनी जीवनशैलीचा उच्चरक्तदाब आणि पूर्वस्थितीवर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली.डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी सर्व वेश्या व्यवसाय महिलांना विश्वास दिला की आपल्याला जी काही मदत लागेल ती मंथन फाउंडेशनद्वारे पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वांच्या सोबत आहोत.

वृषाली गोरे, सुवर्णा पवार, गणेश खेडेकर, अनिता उबाळे, आरती गणुरे, आरती आंग्रे, वर्षा गावडे, मोनिका बोरगे,कविता, मेरी डीसोजा, राधा पाटील, रमा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.