Pune News : अडीच महिन्यात 1.72 लाख विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

तब्बल साडेआठ कोटी रुपये दंड वसूल 

एमपीसी न्यूज – पुण्यात विना फिरणा-या नागरिकांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. मागील अडिच महिन्यात 1 लाख 72 हजार 631 विना मास्क फिरणा-या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल 8 कोटी 54 लाख 10 हजार 550 एवढा दंड वसूल केला आहे. 2 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण कमी होताना दिसत होते मात्र, दिवाळीनंतर पुन्हा  एकदा रूग्ण वाढत आहेत. प्रशासनाने नारिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. विना फिरणा-या नागरिकांवर कावाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर नागरिकामध्ये बेफिकीरपणा वाढला असून ते धोकादायक असल्याचे प्रशासनाने म्हंटले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यानंतर सामाजिक अंतर व मास्क परिधान करण्यच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.