Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी 143 जणांवर कारवाई

Action against 143 people in Pimpri Chinchwad on Monday.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत सोमवारी (दि. 3) 143 जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे सर्रास नागरीक दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठी आणि परवानगी मिळालेल्याच नागरिकांनी प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (31), भोसरी (11), पिंपरी (11), चिंचवड (11), निगडी (0), आळंदी (0), चाकण (3), दिघी (10), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (20), वाकड (5), हिंजवडी (5), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (10), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (21), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (2)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.