Chinchwad: नियमभंग करणाऱ्या आणखी 336 जणांवर कारवाई

Action against 336 violators in pimpri-chinchwad in lockdown

एमपीसी न्यूज- प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत नियमभंग करणाऱ्या 336 जणांवर गुरुवारी (दि.29) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात त्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तरीही नागरिकांकडून प्रशासनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून अशा नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (17), भोसरी (11), पिंपरी (73), चिंचवड (33), निगडी (16), आळंदी (9), चाकण (10), दिघी (13), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (3), वाकड (49), हिंजवडी (24), देहूरोड (21), तळेगाव दाभाडे (2), तळेगाव एमआयडीसी (4), चिखली (41), रावेत चौकी (7), शिरगाव चौकी (1) एकूण 336 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.