Pune News : वारजेतील सराईत गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : वारजेतील सराईत गुन्हेगार गौरव पासलकर आणि त्याच्या साथीदारांनी 13 मार्च रोजी वारजे माळवाडी परिसरातील गोकुळ नगर भागात एका व्यक्तीला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवून त्याच्या मानेला कोयता लावून त्याच्याजवळ रोख रक्कम लुबाडली होती.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी गौरव सुरेश पासलकर आणि मंगेश विजय जडीतकर या दोघांना अटक केली. तर त्याची अन्य दोन साथीदार पल्लू कमलेश चौधरी आणि राजू लक्ष्मण गेहलोत हे फरार आहेत. या सर्व आरोपींना पोलिसांनी आता मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे.

गौरव असल तर हा सराईत आरोपी अटक काही तरुणांना सोबत घेऊन तो अशा प्रकारची गुन्हे वारंवार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गौरव पासलकर याने स्वतःची टोळी तयार करून संघटितपणे दरोडा, जबरी चोरी, दंगा, बेकायदेशीरपणे घरात घुसणे, घातक शस्त्रे घेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राद्वारे जखमी करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे यासारखे गुन्हे वारंवार केले आहेत. त्यामुळे या सर्व टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.