BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रहाटणी, वडमुखवाडी, मोशीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाने रहाटणीतील 12 बांधकाम तसेच वडमुखवाडी, मोशीतील रेडझोन हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवारी) धडक कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मधील 12 वाढीव, नव्याने आरसीसी, पत्राशेड, वीटबांधकाम असे 10,233 चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली. 12 बांधकामे भूईसपाट करण्यात आली. दोन जेसीबी, एक डंपर, 15 मजूर, तीन ब्रेकरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक तीनमधील वडमुखवाडी, मोशीतील रेडझोन बाधित क्षेत्रामध्ये नव्याने सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. आरसीसी, वीट अशी सात बांधकामे भूईसपाट करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3