Pimpri : पिंपळेसौदागर, च-होलीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने आज (गुरुवारी) पिंपळेसौदागर, च-होलीतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली.

पिंपळेसौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गोविंद चौक ते सरस्वती पेट्रोलपंप परिसरातील एकूण दोन टक्के ओट्याचे बांधकाम आणि 15 पत्राशेड बांधकामे पाडण्यात आली. क्षेत्रफळ अंदाजे 2100 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर च-होलीफाटा, चोविसावाडी येथील अनधिकृत बांधकामांवर देखील कारवाई केली आहे.

दोन जेसीबी, एक ट्रक, दहा मजूर, सात महापालिका कर्मचा-यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.