BNR-HDR-TOP-Mobile

Pune : तब्बल 873 वाहनचालकांवर थर्टी फर्स्ट दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई

एमपीसी न्यूज –  पुणे वाहतूक पोलिसांनी तब्बल 873 वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई  केली आहे . काल सोमवारी (दि.31) रात्री 9 ते आज मंगळवारी ( दि.1 ) पहाटे 5 च्या दरम्यान हि कारवाई करण्यात आली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात .  हॉटेल्स , पब्स , अगदी घरांमध्येही पार्टीचे आयोजन केले जाते . विशेष करून अनेकांचे नवीन वर्ष नशेमध्येच सुरु होते . मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यास ड्रंक अँड ड्राइव्हमुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची किंवा गंभीर गुन्हा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त केला जातो. चौकाचौकात वाहतूक नियमनाचे काम करत वाहनचालकांची तपासणी केली जाते. दरम्यान जर वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असेल तर त्या व्यक्तिवर कडक कारवाई केली जाते.

काल रात्री पासून आज ( मंगळवार ) पहाटे पर्यंत ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली .  आणि यामध्ये तब्बल 873 व्यक्ती ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडल्या असून यामध्ये एकूण 693 दुचाकींवर तर  180 तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश होता.एखादी व्यक्ती ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये सापडली तर त्या व्यक्तीवर खटला दाखल केला जातो . आणि त्यानंतर त्या व्यक्तीला न्यायालयात उपस्थित राहावे लागते . न्यायालयाच्या आदेशानुसार संबधीत व्यक्तीवर 1 ते 5 हजारांपर्यंत दंड आकारला जातो. एवढेच नाही तर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील 6 महिन्यांसाठी निलंबित केले जाते.

HB_POST_END_FTR-A2

.