Ravet : रावेत, किवळेतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत व अतिक्रमण विभागाने रावेत, किवळे येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. आज (मंगळवारी) केलेल्या कारवाईत एकूण तीन बांधकामे पाडण्यात आली. 

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 16  येथील रावेत व किवळे अनधिकृत बांधकामे झाली होती. या अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाईमध्ये आरसीसी एक व पत्राशेड दोन असे एकूण तीन बांधकामांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई पाच मनपा पोलीस, एक जेसीबी, दहा  मजूर, दहा पालिकेच्या कर्मचा-यांच्या सहाय्याने करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.