Pune News : शुक्रवार पेठेतील ३ हॉटेल्सवर कारवाई 

Action on 3 hotels in pune

एमपीसी न्युज : कोरोन विषाणू प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत शुक्रवार पेठ येथील ३ हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. 

शहरातील जीवनावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त दुकाने, मार्केट, हॉटेल टप्पे निहाय सुरु करण्यात आलेली आहेत. हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी व हॉटेल मध्ये येत असलेल्या नागरिकांनी फेसि मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सनिटाईज करणे, ग्लोव्हज वापरणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन होत नसल्याचे सर्वत्र पहिला मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त आशिष महाडदळकर यांचे नियंत्रणाखाली शुक्रवार पेठ येथील जयश्री गार्डन, हॉटेल पिकॉक व मल्हार बार कारवाई करण्यात अली आहे.

यांचे विरुद्ध मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या प्रकरण १४ कलम ३(ए) व ४ आणि कलम ४४ आणि कलम ३७६ अन्वये शहर स्वच्छता व नियोजन कायद्या अंतर्गत अस्वच्छता आणि उपद्रव निर्माण करून गैरसोय करणे या अधिनियमान्वये व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार हॉटेल अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्येकी दोन हजार पाचशे असा एकूण  सात हजार पाचशे इतका दंड वसूल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III