Pimpri : दापोडी, वल्लभनगर, रहाटणीतील अतिक्रमणावर कारवाई

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज (गुरुवारी) दापोडी, वल्लभनगर, रहाटणीतील अतिक्रमणावर कारवाई केली.

_MPC_DIR_MPU_II

‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मुंबई-पुणे रस्त्यावरील दापोडी बस स्टॉप, वल्लभनगर येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. तीन हातगाडी, दोन लाकडी काऊंटर, एक लोखंडी बाँक्स, एक तीन चाकी टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत कोकणे चौक ते स्वराज गार्डन, कोकणे चौक ते छत्रपती गार्डन व रहाटणी  ते कोकणे चौकातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. नऊ हातगाडी, एक लोखंडी टपरी, एक लोखंडी पलंग, लोखंडी स्डॅण्ड, दोन काऊंटर जप्त करण्यात आले आहे. कै. आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जप्त केलेले साहित्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.