Pimpri : सलग दुस-या दिवशी महाविद्यालयांबाहेर टवाळखोरी करणा-या तरुणांवर कारवाई

दोन दिवसात 77 रोडरोमिओ ताब्यात

एमपीसी न्यूज – शाळा-महाविद्यालयांसमोर विनाकारण थांबणा-या तरुणांवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी (दि. 29) आणि गुरुवारी (दि. 30) अशी सलग दोन दिवस कारवाई केली. दोन दिवसात एकूण 77 तरुणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी 35 रोडरोमिओंना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी पोलिसांनी आज (गुरुवारी) सकाळी साडेदहा ते दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली. तीन महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणा-या 35 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांचा महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसल्याचे आढळले. त्यावरून सर्व तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमोर त्यांना समज देऊन सोडण्यात आले. तसेच ताब्यात घेतलेल्या तरुणांकडे आढळलेल्या 33 वाहनांची यादी तयार करून पिंपरी वाहतूक विभागाकडे देण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

कारवाई दरम्यान पिंपरी पोलिसांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थिनींना येणाऱ्या सामाजिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत आश्वस्त करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये येत-जात असताना टवाळखोर मुलांकडून त्रास झाल्यास न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थिनींना करण्यात आले. शाळा-महाविद्यालयांबाहेर घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर पोलिसांची नजर असून वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, रामदास मुंढे, वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख, पोलीस कर्मचारी पठाण, नीलकंठ, ठोंगिरे, यादव, गुजर, खाडे, भोसले, वाव्हळ, पोलीस नाईक ढवळे, हगवणे, ओझरकर, करचुंडे, पोटकुले, झनकर, आंबे, घाडगे, जाधव, विधाते, महिला पोलीस कर्मचारी गायकवाड, पिल्ले, बिर्जे, गोलंदाज, निकम, पिसे, येवले, चौधरी, मोमीन, रहाणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.