Pimpri: ‘लागेबांधे असल्याने अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ’ 

नगरसेवक विकास डोळस यांनी परवाना विभागाच्या अधिका-यांना घेतले फैलावर 

0 620

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून मोठ – मोठ्या अनधिकृत फलकांवर कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. अनधिकृत फलकांची माहिती दिली जात नाही. माहिती दडविण्याचे प्रयोजन काय?, बड्या कंपन्यांच्या अनधिकृत फलकांवर कारवाई केली जात नसून त्यांना पोसण्याचे काम सुरु आहे. लागेबांधे असल्यानेच अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी केला. यावरुन आकाश चिन्ह परवाना विभागाला फैलावर त्यांनी घेतले. यामध्ये आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे अशी सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली.

HB_POST_INPOST_R_A

महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत डोळस यांनी शहरातील अनधिकृत फलकांबाबत आकाशचिन्ह परवाना विभागाला माहिती विचारली होती. परंतु, या विभागाने खोटी माहिती दिल्याने डोळस यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. नगरसेवकांना जर परवाना विभाग खोटी माहिती देत असेल. तर इतरांशी हा विभाग कसा वागत असेल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ-मोठ्या कंपन्यांच्या अनधिकृत फलकांवर कारवाई केली जात नाही. त्यांना पोसले जाते. त्यामुळे महापालिकेचा मोठा महसूल बुडत आहे. शहरात नजरेस पडणा-या मोठ-मोठ्या अनधिकृत फलकांवर   कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. महापालिका अधिका-यांचे लागेबांधे असणा-या कंपन्यांचे फलक असल्यामुळेच कारवाई केली जात नसल्याचा आरोप, डोळस यांनी केला. याप्रकरणात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्व:त लक्ष घालावे. आकाश चिन्ह परवाना विभागाला सविस्तर माहिती देण्यास सांगावे, अशी विनंती डोळस यांनी केली.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: