Pimple Saudagar News: अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने सलग चौथ्यादिवशी धडक कारवाई सुरु ठेवली आहे. शिवार चौक ते कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, टप-या काढण्यात येत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज कारवाई सुरु आहे. ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत अनधिकृत व्यावसायीक पत्राशेडवर आज कारवाई करण्यात आली. शिवार चौक ते कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर येथील 53 अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई केली. अंदाजे 50,000 चौरस फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केले.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बांधकाम सुनिल भागवानी यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.