Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी 124 जणांवर कारवाई

Chinchwad: Action taken against 124 people in Pimpri-Chinchwad who break the rule of lockdown एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर पोलिसांकडून ई पास घेणे बंधनकारक आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. अनेक दिवसांनी घराबाहेर पडल्याने नागरिकांकडून वाहतुकीचे आणि अन्य टाळेबंदीचे नियम मोडले जात आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे सर्रास नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (दि.1) 124 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्य सरकारने वाहनांमध्ये जाणा-या लोकांच्या संख्येत वाढ केली आहे. कारमधून चालक आणि दोन प्रवाशांना आतापर्यंत परवानगी होती. मात्र त्यात बदल करत आता चालक आणि तीन जणांना कारमधून जाण्यास तसेच दुचाकीवर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर पोलिसांकडून ई पास घेणे बंधनकारक आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठी आणि परवानगी मिळालेल्याच नागरिकांनी प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (16), भोसरी (7), पिंपरी (1), चिंचवड (5), निगडी (0), आळंदी (0), चाकण (4), दिघी (11), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (6), वाकड (4), हिंजवडी (13), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (6), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (33), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (5)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.