Chinchwad: नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमध्ये 151 जणांवर कारवाई

Action taken against 151 people in Pimpri-Chinchwad for violating rules नागरिक रस्त्यावर राजरोसपणे वावरत आहेत. केवळ कामोकामीच घराबाहेर पडा, असे प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज– पिंपरी-चिंचवड शहरात विविध पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 13) 151 जणांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात आली आहे. तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एकावर कारवाई करण्यात आली आहे.

सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. हा टप्पा 30 जूनपर्यंत आहे. या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

त्यामुळे नागरिक रस्त्यावर राजरोसपणे वावरत आहेत. केवळ कामोकामीच घराबाहेर पडा, असे प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

मात्र, प्रशासनाच्या आदेशाला नागरिक सरळ केराची टोपली दाखवत आहेत. प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणा-यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांचे आकडे दररोज नवीन उच्चांक गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी आणखी सतर्कतेने राहणे गरजेचे आहे.

शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी एमआयडीसी (12), भोसरी (3), पिंपरी (0), चिंचवड (18), निगडी (1), आळंदी (0), चाकण (0), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (47), हिंजवडी (24), देहूरोड (11), तळेगाव दाभाडे (8), तळेगाव एमआयडीसी (6), चिखली (15), रावेत चौकी (2), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 151 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.