Matka Adda in Aundh: औंध परिसरात मटका अड्ड्यावर छापा टाकून 26 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – औंध परिसरातील मटका आड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी 26 जणांना ताब्यात घेतले असून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी (दि.1) औंध-बाणेर लिंक रोड परिसरात केली आहे.

पोलिसांना खबर मिळाली की, परिसरात कल्याण मटका व सोरट जुगार पैस लावून बेकायदेशीररित्या खेळत होते. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेऊन छापा टाकला असता जुगार अड्ड्याचा मालक व इतर 25 जणांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून पोलिसांनी  रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य 2 लाख 1 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये गुरुवारी ‘या’ ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार

ही कारवाई सामाजीक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.