Pune News :पोटभाडेकरू ठेवणार्‍यां पथारी व्यावसायिकांवर होणार कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून परवाने देण्यात आलेल्या 70 टक्के व्यावसायिकांनी आपले परवाने आणि दुकाने भाड्याने दिली आहेत. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे पोटभाडेकरू ठेवणार्‍यां पथारी व्यावसायिकांवर थडक कारवाई  अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार आहे.

शहरातील फेरीवाल्यांना आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क भरुन घेऊन फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. ज्याच्या नावावर प्रमाणपत्र आहे, त्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने परवानगी दिलेल्या ठिकाणी व्यावसाय करणे बंधनकारक आहे. पोटभाडेकरू ठेवल्याचे आढळल्यास अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. फेरीवाला प्रमाणपत्रातील अटी-शर्तींचा भंग केल्यास प्रथम वेळेस एक हजार रुपये दंड तर दुसर्‍या वेळेस 5 हजार दंड आकारण्यात येतो.  त्यानंतरही अंतिमत: फेरीवाला प्रमाणपत्र रद्द करण्यात येते.

मात्र नोंदणीकृत आणि परवानाधारक फेरीवाल्यांकडून आणि पथारी व्यावसायिकांकडून परवाने व दुकाने भाड्याने दिली जातात. अशा प्रकारे 70 टक्के व्यावसायिकांनी प्रमाण पत्रातील अटी व शर्थींचा भंग केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक्ष व्यावसायिक आणि त्यांच्याकडे असलेले प्रमाणपत्र तपासण्यासाठी पालिका प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.