Pune News : अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाईला येणार वेग

एमपीसी न्यूज – अतिक्रमण विभागाचे काम अधिक कार्यक्षम व जलदगतीने व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन व राज्य शासनाकडून सेवा नियमांतर्गत 189 पदांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी केवळ 22 पदे भरण्यात आली आहेत. मात्र आजही 173 निरीक्षकांची पदे रिक्त आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून 163 निरीक्षकांची भरती झालेली नाही, याचा विभागावर वाईट परिणाम होत आहे. यासाठी भरतीची मागणी होत होती.याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी कामगारांना कंत्राटावर घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

त्यानुसार आता 45 सहायक अतिक्रमण निरीक्षक अतिक्रमण विभागाकडून 9 महिन्यांसाठी घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेला 92 लाखांचा खर्च येणार आहे. नुकतीच या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. अवैध फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन ठेकेदारांना हे काम विभागून देण्यात येणार आहे.  दिशा एजेन्सी आणि बापू एन्टरप्रायजेस अशा दोघांना हे काम दिले जाईल. यासाठी पालिकेला 92 लाखांचा खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.