Maharashtra Local Train News : निर्धारित वेळेच्या व्यतिरीक्त लोकलने प्रवास केल्यास होणार कारवाई

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र सरकारने एक फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आखून दिलेल्या निर्धारीत वेळेच्या व्यतिरीक्त जर प्रवास करताना कोणी आढळल्यास त्याला 200 रुपये दंड आणि 1 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 पर्यंत, दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत व रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता वेळेचं भान ठेऊनच नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे.

याचवेळेस रेल्वे स्थानकांमधील तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळेच्या अगोदर तिकीट खिडक्यांवर तिकीट देण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.