India Corona Update : ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली, रिकव्हरी रेट 98.36 टक्के

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाचा विळखा सैल होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 8 हजार 954 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 10 हजार 207 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, ती एक लाखाच्या खाली आली आहे. सध्या 99 हजार 023 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.35 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 96 हजार 776 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 40 लाख 28 हजार 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 267 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 69 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारी नुसार देशात आजवर 64 कोटी 24 लाख 12 हजार 315 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी गेल्या 24 तासांत 11 लाख 08 हजार 467 नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 124 कोटी 10 लाख 86 हजार 850 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.