Bikramjeet Kanwarpal : अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे करोनामुळे निधन

0

एमपीसी न्यूज : बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याबाबतची माहिती चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते लिहतात, ‘आज सकाळी मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचं करोनामुळे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले. ते सेवानिवृत्ती सैन्य अधिकारी होते त्यांनी अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या दुःखात सामील आहोत.’

बिक्रमजीत कंवरपाल यांनी 2003 पासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी दीया और बाती हम, ये है चहेतें, दिल ही तो है यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. त्यांनी पेज 3, रॉकेट सिंगः सेल्समॅन ऑफ द ईअर, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि द गाजी अटॅक या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment