Paresh Raval appointed as NSD Chief: अभिनेते परेश रावल यांची एनएसडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

भारतात 1959 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीमधून अनेक नामवंत अभिनेते व अभिनेत्रींनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले आहे.

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परेश रावल पुढील चार वर्षे एनएसडीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

दिल्ली येथे असणा-या एनएसडीने ट्वीट करत माहिती दिली की, ‘आम्हाला सांगताना आनंद होतोय की, राष्ट्रपतींनी परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एनएसडी कुटुंब त्यांचे स्वागत करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी नवीन उंची गाठेल’.

भारतात 1959 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीमधून अनेक नामवंत अभिनेते व अभिनेत्रींनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले आहे.

परेश रावल यांच्या फिल्मी करियरची सुरुवात 1984 मध्ये आलेल्या ‘होली’ चित्रपटातून झाली होती. यानंतर 1985 मध्ये आलेल्या ‘अर्जुन’मध्येही ते दिसले होते. परेश रावल यांना 1993 मध्ये ‘सर’ आणि 1994 मध्ये ‘वो छोकरी’साठी बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, त्यांना चित्रपटातील कामामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.