Pune News : पठाण चित्रपटावरून पुन्हा वादंग, बजरंग दल आक्रमक; पुण्यातील पोस्टर हटवले

एमपीसी न्यूज : अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित चित्रपट पठाण विरोधात पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले आहे.  पुण्यातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते.(Pune News) बजरंग दलानं राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं. 

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटना या विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र; अखेर युती झालीच!

आता पुन्हा एकदा बजरंगदलाकडून या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये अंदोलकाने असे पोस्टर लावु नये असा इशारा दिला आहे.(Pune News) पठाण चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, त्याचबरोबर थेिअटर मालकांना असे पोस्टर लावू नये अशी विनंती केली आहे. जोरदार घोषणाबाजी करत पठाणचं पोस्टर फाडण्यात आलं.

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान (Pune News) या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे.

शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  250 कोटींच्या बजेटमध्ये ‘पठाण’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.