Suvrat Finds Something Strange: सुव्रत जोशीला अचानक लागला वेगळाच शोध…

actor suvrat joshi finds corona tea in London's super market सुव्रत सध्या पत्नी सखी गोखलेसह लंडनमध्ये असून तिथूनच ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेसाठी शूटिंग करत आहे.

एमपीसी न्यूज – सध्या सगळीकडे कोरोनाचा प्रचंड बोलबाला आहे. काही महिन्यांपूर्वी माहितीही नसलेल्या या नावाने आपले जीवन व्यापून टाकले आहे. याआधी कोरोना हा मेक्सिकोमघील एक बिअरचा ब्रँड होता. मात्र या कोरोना काळात त्या कंपनीला देखील प्रचंड टीका सहन करावी लागली. पण आता कोरोना हे नाव फक्त या पुरतेच मर्यादित राहिले नसल्याचा अनोखा शोध अभिनेता सुव्रत जोशी याला लागला आहे.

सुव्रत सध्या पत्नी सखी गोखलेसह लंडनमध्ये असून तिथूनच ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेसाठी शूटिंग करत आहे. सुव्रत नुकताच घरातील काही आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी बाजारात एका चहा पावडरचं नाव वाचून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. चहा पावडरचे नाव चक्क कोरोना असे होते.

View this post on Instagram

म्हणजे? काय? व्हॉट? कशासाठी??? अर्थ काय? विनोद आहे की धंदा बुडावयाचा आहे? मजा आहे? चहा प्यायचा? प्यायला कोण येतंय? काय होतंय?? याच्या वाफेनी काय होईल? ही चहापत्ती वापरून चहा विकला तर दुकानाचे नाव "अमृततुल्य" असेल की "विषतुल्य"? चहाचे कप सॅनिटायझेर नी धुवावे लागतील का? का? का? कसे???हे आणि अनेक प्रश्न माझ्या मनात उकळत आहेत,कुणी गाळून देईल का?…आ ट्युईकमिओपदलरंघे.…%..^…२..:..///. #corona #tea

A post shared by Sula (@suvratjoshi) on


इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या चहा पावडरच्या पॅकेटचा फोटो पोस्ट करत सुव्रतने लिहिलं, ‘म्हणजे? काय? व्हॉट? कशासाठी??? अर्थ काय? विनोद आहे की धंदा बुडावयाचा आहे? मजा आहे? चहा प्यायचा? प्यायला कोण येतंय? काय होतंय?? याच्या वाफेनी काय होईल? ही चहापत्ती वापरून चहा विकला तर दुकानाचे नाव “अमृततुल्य” असेल की “विषतुल्य”? चहाचे कप सॅनिटायझरनी धुवावे लागतील का? का? का? कसे???हे आणि अनेक प्रश्न माझ्या मनात उकळत आहेत, कुणी गाळून देईल का? ‘सुव्रतच्या या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.