Actress Divya Chouksey passed away: अभिनेत्री दिव्या चोक्सीचे कर्करोगाने निधन

Actress Divya Chouksey passed away दिव्याने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हे अपना दिल तो आवारा’ या चित्रपटात काम केले होते.

एमपीसी न्यूज- अभिनेत्री दिव्या चोक्सीचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र १२ जुलै रोजी तिचे कर्करोगाने निधन झाले.

सुप्रसिद्ध मॉडेल असलेल्या दिव्याने चित्रपट आणि मालिकांमध्येदेखील काम केले होते. दिव्याने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हे अपना दिल तो आवारा’ या चित्रपटात काम केले होते. दिग्दर्शक मंजोय मुखर्जीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून दिव्या कर्करोगाशी झुंज देत होती. भोपाळ येथे तिचा मृत्यू झाला आहे.

दिव्याच्या निधनाची माहिती तिच्या चुलत बहिणीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. ‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की, माझी चुलत बहीण दिव्या चोक्सीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे.

तिने 12 जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. तिने लंडनला जाऊन अभिनयाचे धडे घेतले होते. ती एक चांगली मॉडेल होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच मालिकांमध्येही काम केले आहे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले.

‘मी जे सांगू इच्छिते त्यासाठी माझ्याकडे योग्य शब्द नाहीत. मागील काही महिन्यांपासून मी कोणाच्याही संपर्कात नव्हते. पण माझ्यासाठी खूप संदेश आले होते. मी आज तुम्हाला सगळ्यांना ही बातमी सांगते की, मी मृत्यूशय्येवर आहे.

मी खंबीर आहे, माझ्या दुस-या पीडारहित जीवनासाठी. फक्त परमेश्वरच जाणतो की, माझ्या फॅन्सची माझ्या आयुष्यात काय किंमत आहे. धन्यवाद’, अशी दिव्याने निधनापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like