Sonali Patil Accident : अभिनेत्री सोनाली पाटील यांचा चाकण मध्ये अपघात; उपचारानंतर डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या सीझनच्या शोनंतर सोनाली पाटील प्रसिद्धी झोतात आली. आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकणाऱ्या सोनालीचा (Sonali Patil Accident) अपघात झाला. ही बातमी सोनालीने सोशल माध्यमाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत नुकतीच शेअर केली आहे. हा अपघात पुणे – नाशिक महामार्गावर चाकण येथे झाला. त्यानंतर तात्काळ तिला चाकण मधीलच एकता नगर भागातील केअरवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी सोनाली पाटील (Sonali Patil Accident) पुणे नाशिक महामार्गाने नाशिककडे मित्रासोबत बाईक वरून जात होती. चाकण मध्ये आल्यानंतर मागून भरधाव येणाऱ्या एका बाईकस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनालीसह तिचा बाईक चालवणारा मित्र सुद्धा खाली पडला.

Todays Horoscope 18 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

धडक जोरदार बसल्याने सोनाली जागीच बेशुद्ध पडली. अपघात झाल्यानंतर जमावाने सोनालीला चाकण येथील एकता नगर भागातील केअरवेल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला काही काळ आयसीयूमध्ये भरती केले. त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. स्वतः सोनालीने (Sonali Patil Accident) या बाबतची माहिती सोशल माध्यमात शेअर केल्यानंतर चाकण मधील अपघाताची ही बाब समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.