Actress Comes On Sets By Rikshaw: यशस्वी अभिनेत्री आणि चक्क रिक्षाने सेटवर येते…

Actress Yashashri Masurkar Comes On Sets By Rikshaw गाडी विकून रिक्षा घेण्याबाबत विचारले असता तिने त्याचे गमतीशीर कारण पण सांगितले.

एमपीसी न्यूज- आलिशान घर, गाडी, भरपूर पैसा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी आपण आयुष्यभर मेहनत करतो. त्यातच तरुणांना गाडीचे मोठ्ठे पॅशन असते. ऐटबाज चमकत्या रंगाची गाडी हे त्यांचे स्वप्न असते. आजकाल लहानवयातच गाडी दाराशी ऊभी असते. पण या काळातही एक तरुण अभिनेत्री अशी आहे तिने चक्क गाडी विकून रिक्षा विकत घेतली आहे. आणि ती अगदी चित्रीकरणासाठीदेखील रिक्षाने जाते-येते.

हिंदी, मराठी चित्रपट व मालिकांमध्ये सहजसुंदर अभिनय करणारी ही अभिनेत्री म्हणजे यशश्री मसुरकर होय. यशश्रीने तिची गाडी विकून रिक्षा विकत घेतली. तिचे सहकारी याबद्दल तिची थट्टा देखील करतात. पण ती बिनधास्तपणे कुठेही रिक्षाने जाते. तिला स्टेटस सिंबॉलची फारशी पर्वा नाही हेच यातून दिसून येते.

गाडी विकून रिक्षा घेण्याबाबत विचारले असता तिने त्याचे गमतीशीर कारण पण सांगितले. तिचा एक परदेशातील मित्र भारतात येणार होता. त्याला इथे भरपूर फिरायचे होते. म्हणून मग तिने गाडी विकून रिक्षा घेतली. मात्र नंतर या रिक्षाचे काय करायचे हा प्रश्न पडला. मग ती रिक्षा स्वत:च वापरायची असे तिने ठरवले.

यशश्रीच्या मते यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. तसेच ड्रायव्हर ठेवून त्याला पगार देणे यापेक्षा ही रिक्षा ती स्वत:च चालवते. त्यामुळे ती समाजाच्या सगळ्या लोकांशी पटकन कनेक्ट होते.

वेळप्रसंगी ती मुलांना शाळेतदेखील सोडते. यशश्री म्हणते की कार असती तर मी अशी सगळ्यांशी पटकन कनेक्ट होऊ शकले नसते. एक अंतर राहिले असते.

यशश्रीने रंग बदलती ओढनी, चक्रवर्ती सम्राट अशोक, आरंभ या हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचे रंग दाखवले आहेत. तसेच ती आरजे सुद्धा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.