Pune News : ‘आदर्श सरपंच: प्रभाकरदादा’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – ‘आदर्श सरपंच: प्रभाकरदादा’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) प्रकाशन झाले. वडगाव शिंदे, लोहगाव या गावचे आदर्श सरपंच कै. प्रभाकर किसन शिंदे यांच्या जीवनावर हे पुस्तक आधारित आहे. डॉ. सीमा काळभोर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित, उद्योजक बाळासाहेब भोसले, सागर काळभोर, ज्ञानेश्वर काकडे, दिगंबर शेवाळे, राजेंद्र गायकवाड, प्रा. अनिल शिंदे, सतिश गायकवाड, निखील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत प्रभाकर शिंदे यांचे वडगाव शिंदे गावच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कामगार अशा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते 12 गावचे वर्षे सरपंच, 3 वर्षे उपसरपंच व 22 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. आयुष्यातील 54 वर्षे त्यांनी समाजसेवेला अर्पण केली.

प्रभाकर शिंदे भारत फोर्ज कंपनीत कामगार युनियनचे अध्यक्ष होते. कंपनीचे सर्वेसर्वा बाबासाहेब कल्याणी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. डॉ. राजा दीक्षित यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, अनेक मान्यवरांच्या शुभेच्छापत्र या पुस्तकाला मिळाल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.