Pimpri : राष्ट्रीय साक्षरता दिन व शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक सत्कार  

एमपीसी न्यूज – शिक्षक दिन व राष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा व शिक्षक आघाडीच्या पुढाकाराने आदर्श शिक्षकांचा शाल, श्रीफळ व मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेक ज्येष्ठ शिक्षक ज्यांनी प्रदीर्घ कालावधी शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून समाज घडवण्याचे मोठे काम सुरु ठेवले अशा सुमारे पन्नास शिक्षकांना गौरवण्यात आले. चांगली संस्कारीत पिढी घडवण्याचे कार्य शिक्षक अविरत करत असतात व याप्रसंगी, अशाच माझ्या लहानपणीच्या वाघमारे गुरुजींची मला कायम आठवण येते. ते पहाटे पाच वाजता गावात येत व रात्री आठ वाजेपर्यंत गावातल्या मुलांच्या भल्यासाठी झटत, असे भावनिक सबोधन अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केले.

यावेळी शिक्षण मंडळ सभापती सोनाली गव्हाणे शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संजय शेंडगे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सलीम शिकलगार, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, माजी महापौर आर एस कुमार, अमित गोरखे, अमोल थोरात, नगरसेविका आशा शेंडगे, अश्विनी बोबडे, इम्तियाझ शेख, प्रशांत बोरा, दत्तात्रय यादव, रामनाथ खेडेकर, हेमंत बनगर, संजय जाधव, भरत काशीद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीवनी पांडेय व नंदकुमार ठाकूर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.