Pimpri: अतिरिक्त पदभार असणा-या अधिकारी, उपअभियंत्यांना थंब इम्प्रेशनमध्ये सूट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वर्ग एकच्या ज्या अधिका-याकडे विभागप्रमुख या पदाचा अतिरिक्त कार्यभार, तसेच वर्ग दोनच्या उपअभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांकडे कार्यकारी अभियंताचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. या अधिका-यांना अतिरिक्त पदभार असेपर्यंत ‘थम्ब इम्प्रेशन’मधून सूट देण्यात आली आहे.

तथापि, त्यांना दैनंदिन हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, नुकतीच महासंघाच्या 65 पदाधिका-यांना देखील ‘थम्ब इम्प्रेशन’मधून सवलत देण्यात आली होती.

  • प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी तसेच कर्मचा-याने महापालिकेतील कार्यालयात नियुक्‍ती असलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्याकरिता महापालिका आस्थापनेवरील कर्मचा-यांना थम्ब इम्प्रेशनद्वारे उपस्थिती नोंदविणे सक्‍तीचे असून, हजेरी पत्रकावर स्वाक्षरी देखील करणे बंधनकारक आहे. तथापि, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून बायोमेट्रिक थंब इम्प्रेशनद्वारे उपस्थिती नोंदविण्यातून सूट मिळण्याची वारंवार मागणी केली जात आहे.

महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वर्ग एकच्या ज्या अधिका-याकडे विभागप्रमुख या पदाचा अतिरिक्त कार्यभार, तसेच वर्ग दोनच्या उपअभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांकडे कार्यकारी अभियंताचा पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.

  • या अधिका-यांना अतिरिक्त पदभार असेपर्यंत ‘थम्ब इम्प्रेशन’मधून सूट देण्यात आली आहे. तथापि, त्यांना दैनंदिन हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिरिक्त कार्यभार काढल्यास ही सवलत बंद होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.