Pune News: पुणे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आयुष प्रसाद यांच्याकडे ; नवीन जिल्हाधिकाऱ्यां बाबत उत्सुकता

Additional charge of Pune District Collector to Ayush Prasad; curiosity about the new Collector.

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दिला आहे. तशा प्रकारचे आदेश राव यांनी दिले.

तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाली आहे. त्यामुळे आता नवीन जिल्हाधिकाऱ्यां बाबत उत्सुकता आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट निर्माण झाले असताना राम यांनी धडाकेबाज निर्णय घेऊन या संकटाला आटोक्यात ठेवले होते. त्यांनी अतिशय चांगले काम केले. त्यामुळेच त्यांना दिल्लीत बोलाविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात राम यांनी जास्तीत जास्त फिल्डवर जाऊन काम केले.

पुणे जिल्हाधिकारी पदासाठी अनेकांची नाव स्पर्धेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाच्या नावाला पसंती देणार, याकडे लक्ष लागले आहे. नवल किशोर राम हे बदली झालेल्या ठिकाणी रवाना झाले. पुणे जिल्हाधिकारी पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत.

हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व  यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि  योगेश म्हसे यांचे नाव चर्चेत आहे.

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन कोणाला पुणे जिल्हाधिकारी पदावर काम करण्याची संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.