Pimpri : अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची पदोन्नतीने बदली

रामनाथ पोकळे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी वर्णी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त रामनाथ पोकळे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तलयाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून मकरंद रानडे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, नऊ महिन्यांत रानडे यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.