Addmission News : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पदवीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून, सीईटी नाही

एमपीसी न्यूज – राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, पुढील प्रवेशाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावी नंतरच्या शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून (गुरुवार, दि.05) सुरू होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, यासाठी सीईटी परीक्षा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना बारावीच्या मार्कांवरच कॉमर्स , सायन्स (Science) आणि आर्ट्समध्ये  (Arts) प्रवेश दिला जाणार आहे. यासंबंधीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. दरवर्षीच्या बारावीच्या निकालापेक्षा यंदा बारावीचा निकाल तब्बल नऊ टक्के जास्त लागला आहे त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठं वाढ झाली आहे.

‘बारावी परीक्षेचा निकाल लागला असून अकृषि विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधील पारंपरिक अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे इयत्ता 12 वीच्या गुणांच्या आधारावरच होणार असून यासाठी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेतली जाणार नाही.’ असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

विविध अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम याकरता प्रदेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र CET देणं अनिवार्य असणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी CET घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.