_MPC_DIR_MPU_III

Chinchwad: आदीशक्तीचा जागर; 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम

साडेतीन शक्तीपीठे व आयोध्यातील नियोजित श्रीराम मंदिर भव्य प्रतिकृती दर्शनाची संधी

नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – नवरात्र उत्सावानिमित्त चिंचवड नवरात्र महोत्सव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, साडी परिधान स्पर्धा,मंगळागौर स्पर्धा, शारदीय कवी संमेलन, श्रीसुक्त पठाण, सामूहिक मृदंग वादन, देवीच्या भजनांचा संगीतमय कार्यक्रम, महाआरोग्य शिबिर, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. तसेच साडेतीन शक्तीपीठे व आयोध्यातील नियोजित श्रीराम मंदिर भव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. मंदिराची 61 फूट उंची असून 40 बाय 60 फूट रुंदी आहे. एकूण 38 खांब असलेल्या असे भव्य श्रीराम मंदिराचा देखावा पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

याबाबतची माहिती आयोजिका तथा नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी दिली. चिंचवड, चापेकर चौकात आठ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. या नऊ दिवसांमध्ये रोज सकाळी सात वाजता कुंकुमार्जन घेतले जाणार आहे. दररोज सकाळी आणि रात्री आठ वाजता देवीची महाआरती होणार आहे. भजन स्पर्धा , मंगळागौर स्पर्धा , आणि रंग माझा साडीत वेगळा या स्पर्धेत प्रथम येणा-यांस दहा हजार, द्वितीय पाच हजार आणि तृतीय क्रमांकास तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. बुधवारी (दि.10) सायंकाळी चार वाजता घटस्थापना केली जाणार आहे. त्यानंतर स्वानंद धुपारती मंडळ यांची आरती होणार आहे. सायंकाळी चिंचवड नवरात्र महोत्सव 2018 चे उद्‌घाटन होणार आहे. सायंकाळी चार ते आठ या वेळेत भजन स्पर्धा होणार आहेत. रात्री साडेआठ ते दहा या वेळेत ‘रंग माझा साडीत वेगळा’ ही स्पर्धा होणार आहे.

शुक्रवारी (दि.12) सायंकाळी चार ते आठ या वेळेत भजन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर ‘रंग माझा साडीत वेगळा’ स्पर्धा होणार आहे. शनिवारी (दि.13) सायंकाळी पाच ते सहा या वेळेत श्रीसुक्त पठण, कुंकमार्जन होईल.त्यानंतर ‘कुटुंबातील संवाद व नातेसंबंध’या विषयावर अपर्णाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री साडेआठ वाजता मंगळागौरी स्पर्धा, महाभोंडला होणार आहे. रविवारी (दि.14)सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत महाआरोग्य शिबिर होणार आहे. डोळ्यांची तपासणी करुन अल्प दरात चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी पाच ते आठ या वेळेत ब्रह्मनाद मृदंगाचा (सामूहिक मृदंगवादन) होणार असून रात्री साडेआठ वाजता संतमेळा होणार आहे. सोमवारी (दि.15)सायंकाळी पाच वाजता शारदीय कवी संमेलन तर सायंकाळी सहा वाजता सद्‌गुरु श्री वामनराव पै यांच्या शिष्यासौ. सुरेखाताई नर यांचे प्रवचन होणार आहे.

मंगळवारी (दि.16)सकाळी ९ ते ११ या वेळेत कुमारीका पूजन होणार आहे. याच वेळेत मोरया गोसावी यांचे चरित्र पठन तसेच सौ. लताताई भोसेकर यांचे प्रवचन देखील होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समृद्धी महिला मंडळाचा जोगवा आणि देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर ब्रह्मकुमार दथरथ यांचे प्रवचन होणार आहे. बुधवारी (दि.17) रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत ज्येष्ठांसाठी “माइंड जिम” (मनाची व्यायामशाळा ) हा आगळावेगळा उपक्रम घेतला जाणार आहे. ज्यामार्फत ज्येष्ठांना आपला स्वआदर आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल. सायंकाळी ६ ते ८’होम मिनिस्टर’, त्यानंतर लहानांपासून थोरांपर्यंत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून यामध्ये ‘घराघरात श्रीराम, घराघरात छत्रपती शिवाजी महाराज’ हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार (दि.18) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ‘माता की चौकी’ देवीच्या भजनांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमांचा जास्तीतजास्त महिलांनी लाभ घ्यावा. नाव नोंदणीसाठी अश्विनी चिंचवडे यांच्या संपर्क कार्यालयात करु शकता. अधिक माहितीसाठी 7719902929 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आयोजिका नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केले आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.