Maval : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप 

एमपीसी न्यूज : ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ अंतर्गत आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून दहिवली येथील 24 कातकरी बांधवांना गुरुवारी (दि.9) जातीच्या (Maval) दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दहिवली गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न झाला.

कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर वास्तव्यास असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळविण्यासाठीची किचकट प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील अडीच वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेण्यासाठी ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबविले. त्याचा फायदा आजपर्यंत दोन हजारांहून अधिक कातकरी कुटुंबाना झाला आहे. कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध होत असल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 29 – मराठी चित्रपटसृष्टीतली पहिली महिला सुपरस्टार रंजना

यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनिल येवले, नवनाथ पडवळ,वर्षा मावकर,राजूशेठ देवकर,माजी उपसरपंच शामराव गायकवाड, तानाजी पडवळ,किरण येवले,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दहिवली विष्णू मावकर, निलेश पडवळ, गणेश मावकर, किसन मावकर, शरद मावकर, हरिभाऊ मावकर, (Maval) कोंडू मावकर, अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस रुपाली मावकर, कार्याध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पूजा मावकर, सचिन वामन, अरविंद पाटील, संतोष जाधव आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.