Pimpri News : अवैध बांधकाम शास्तीकराच्या रकमेतून ‘समायोजित’ करा – शांताराम बो-हाडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार स्क्वेअर फुटापर्यंच्या माफ झालेल्या निवासी बांधकामांच्या शास्तीकराची रक्कम मालमत्ता करात समायोजित (वळती) करण्यात यावी. त्यानंतरच मालमत्ता कराची बीले वाटावीत, अशी मागणी यमुनानगर येथील रहिवासी शांताराम बो-हाडे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात बो-हाडे यांनी म्हटले आहे की, महापालिकेने सर्व नागरिकांना मालमत्ता कराची बिले वाटण्यात आली आहेत. परंतु, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आधी भरलेल्या अवैध बांधकाम शास्ती कराच्या रकमेतून मिळकत कर समायोजित केलेला आढळला नाही.

आम्हा नागरिकांना वारंवार महापालिकेला समायोजित करण्याबाबत सांगणे, त्यासाठी आंदोलन करणे, की, अवैध बांधकाम शास्ती कर मालमत्ता करांमध्ये समायोजित करावा. नंतरच गरीब आणि हताश नागरिकांना मालमत्ता कराची बिले वाटावीत, हे सांगणे जिकिरीचे, मनस्ताप देणारे, आणि विशेषतः त्रासदायक वाटते. हक्काची व सुविधेची सकारात्मक अपेक्षा ठेवतो. त्यामुळे अगोदर अवैध बांधकाम शास्ती कराच्या रकमेमधून मालमत्ता कर समायोजित करण्यात यावा. त्यानंतरच बिलांचे वाटप करावे अशी बो-हाडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.