KPMG : ‘केपीएमजी’वर प्रशासन मेहरबान; पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीतर्फे सुरु असलेल्या कामासाठी नेमलेल्या ‘केपीएमजी’ (KPMG) या सल्लागार संस्थेवरील प्रशासनाची मेहरबानी सुरुच आहे. आता पुन्हा या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी 29 लाख 78 हजार 400 रुपये खर्च होणार आहे. त्याला प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

महापालिकेच्या वतीने शहरामध्ये जेएनयुआरएम, अमृत व स्वच्छ भारत अंतर्गत प्रोजेक्‍ट मॉनेटरिंगचे काम सुरू आहे. या कामासाठी केपीएमजी या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेवर कोट्यावधी रुपये खर्च करूनही अमृत योजना फसली आहे. असे असताना केपीएमजी या संस्थेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. संस्थेचे पाच कर्मचारी काम करत आहेत. त्यांना प्रति कर्मचारी महिन्याला तब्बल दोन लाख रुपये पगार दिला जातो. त्यासाठी महिन्याला 9 लाख 92 हजार 800 रुपये इतका खर्च आहे. त्यांना तीन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. तीन महिन्यासाठी 29 लाख 78 हजार 400 रुपये खर्च होणार आहे.

सिटी ट्रान्सफॉर्मेशन कार्यालयाच्या कामासाठी सल्लागार संस्था म्हणून मेसर्स पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची मुदत 1 नोव्हेंबर 2022 रोजी संपत आहे. त्यापूर्वीच त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याला 24 लाख 16 हजार याप्रमाणे एक वर्षासाठी 2 कोटी 89 लाख 99 हजार 992 रुपये खर्च येणार आहे. या खर्चासह एक वर्षाची मुदत वाढवून देण्यास (KPMG) आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली.

Ajit Pawar : अनेकदा मागितलं पण गृहमंत्री पद काय दिलंच नाही – अजित पवारांचा मोठा खुलासा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.