Pimpri : प्रशासकीय अधिका-यांनी नियोजनाला प्राधान्य द्यावे; आयुक्तांचे युपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – भारतात नागरिकरणाचा वेग वाढत असल्याने आगामी काळात त्याबाबतच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे लागेल. प्रशासकीय अधिकार्‍यांनी तसा दृष्टीकोन ठेवावा, असे मार्गदर्शन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेचे ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे येथील विद्यार्थ्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली.  सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परिक्षा केंद्राच्या युपीएससीचे विद्यार्थी डॉ. विद्या मापारी-यादव, ऐश्वर्या हिरे, सुप्रिया मोहिते, गौरी पुजारी, वर्षा साबळे, सचिन लांडे, संग्राम शिंदे, युगल पाटील, सुदर्शन सोनवणे, शुभम जाधव, राकेश अकोलकर, महेश गिते, मंदार पत्की, निलेश प-हाते, उमेश रामटेके, संदिप देवकाते, सागर जत्राते, प्रतिक पतरांगे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात महापालिकेच्या आजपर्यंत झालेल्या विकासाची माहिती दिली. रस्ते, पाणीपुरवठा, अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण, जलनि:सारन, पदपथ, औद्योगिक परिसर याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले.

अण्णा बोदडे सहाय्यक आयुक्त, माहिती व जनसंपर्क विभाग यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही पंधरावडाबाबत माहिती दिली. नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे. लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी समाजातील सर्व लोकांना सतत शिक्षणाद्वारे जागृत करण्यासाठी पंधरावड्याचे आयोजन केले असून प्रत्येकाने मतदानात सहाभागी होवून आपल्या बरोबरच आपल्या सहकार्‍यांनाही त्यात सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.